फुलंब्री (प्रतिनिधी) : तालुक्यातील बाबरा ग्रामपंचायत येथे शिवभिषेक स्थापना दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेचा आदर्श समाजाने अंगीकारावा, असे आवाहन केले.
यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच यमुनाबाई प्रभाकर वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
तसेच डॉ. अंबादास काथार, राजेंद्र चव्हाण, कचरू मैंद, प्रभाकर वाघ, रामेश्वर पवार, रखमाजी पवार, उत्तम चव्हाण, विजय काथार, सतीश काळे, दामू बर्डे, सुकलाल आग्रे, लक्ष्मण मैंद, संतोष पवार यांच्यासह गावातील अनेक नागरिक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. शिवभिषेक स्थापनेच्या माध्यमातून शिवरायांचे विचार, शौर्य, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन केले. बाबरा गावात शिवभिषेक स्थापना दिन उत्साह, भक्तिभाव आणि शिवप्रेमाच्या वातावरणात झाला.














